
अहिल्यानगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल केशा ऊर्फ किशोर विजय पवार (वय २७, रा. आरडगाव, ता. राहुरी) याला भारतीय दंड संहिता तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) नुसार २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली.