
श्रीरामपूर: पत्नीच्या डोक्यात कुदळीने घाव घालून तिचा निर्घृण खून करणारा आणि सात वर्षीय मुलास अंब्याच्या झाडाला गळफास देऊन ठार मारणाऱ्या नराधम पित्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बलराम दत्तात्रय कुदळे (रा. खैरी निमगाव, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे.