
अहिल्यानगर : शहरातील रस्ते व फूटपाथवर ठिकठिकाणी अनधिकृत विक्रेत्यांनी व्यवसाय थाटले आहेत, तसेच शहर व उपनगर परिसरात अनेक प्रमुख रस्त्यांवर, रस्त्यालगत बंद अवस्थेतील जुनी वाहने लावण्यात आली आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. शहराच्या स्वच्छतेवरही त्याचा परिणाम होत असल्याने अशी वाहने जप्त केली जाणार आहेत.