
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे गुरुवारी नगर-मनमाड रस्त्यावर श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात पोलिसांनी विना नंबर प्लेटच्या दुचाकींवर कारवाईचा बडगा उगारला. पकडलेल्या ३२ पैकी ३० दुचाकींवर १६,७०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कागदपत्रे हजर न केल्याने दोन दुचाकी राहुरी पोलिस ठाण्यात जमा ठेवण्यात आल्या.