
कोपरगाव : आयेशा कॉलनी व बैलबाजार रस्त्यावर बांधलेली अनधिकृत पक्की सिमेंटची घरे, दुमजली इमारती, गाळे यावर अतिक्रमणाचा बडगा आज उगारण्यात आला. आयेशा कॉलनी परिसरातील अवैध कत्तलखाने, संरक्षक भिंती पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले. अनेक वर्षांनंतर बैलबाजारकडे जाणाऱ्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. वर्दळीचा भाग व सर्वाधिक अतिक्रमणे असल्याने रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. छत्रपती संभाजी महाराज चौकातील अरशी कॉम्प्लेक्समधील अनधिकृत चौथ्या मजल्यावर देखील जेसीबीचा हातोडा पडला.