कोरोनासंदर्भात मोठी कारवाई! जिल्हाधिकारी, एसपी, आयुक्त उतरले रस्त्यावर,

Action taken by SP, Collector against those who do not use masks
Action taken by SP, Collector against those who do not use masks
Updated on

नगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील व महापालिका आयुक्त शंकर गोरे आज थेट रस्त्यावर उतरले. शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर, तसेच शासकीय कार्यालयांत विनामास्क वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले व पोलिस अधीक्षक पाटील यांनी सुरवातीला भिंगारवाला चौकातील दुकानांत, तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना फटकारले. नियमांचे पालन करण्याची सूचना केली. विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. तेथून ते स्वस्तिक बसस्थानक परिसरात आले. तेथे बसमधील विनामास्क प्रवाशास दंड भरण्यास सांगितले. इतर बसचीही तपासणी केली. शासकीय कार्यालयांत "मास्क नाही- प्रवेश नाही' अशी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा ताफा जिल्हा परिषदेत गेला. तेथेही विनामास्क आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. तेथून त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथील काही कार्यालयांना भेटी दिल्या. मास्क न घालता फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली. 
 

शहरात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बेजबाबदार नागरिकांमुळे जिल्ह्याचे आरोग्य धोक्‍यात आले असून, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. दुकानात विनामास्क नागरिक आढळून आले, तर दुकानांवर महिनाभर बंदी घालण्याचा विचार आहे. 
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी 

ज्या ठिकाणी लग्नसमारंभ होत आहेत, अशा मंगल कार्यालयांना भेटी देऊन, नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक 
 
गेल्या 20 दिवसांतील कारवाई 
* 10 हजार रुपये दंड - 18 मंगल कार्यालयांना 
* 16 हजार - नागरिकांवर कारवाई 
* 28 लाख रुपये- दंड वसूल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Unique Political Devotion on Display in Shirdi as Six-Year Vow Comes to End
Shock in Pune as Minor Girl Dies Before Eye Surgery; Questions Raised Over Hospital Procedure
Medical Negligence Allegations: 6-Year-Old Priyanshi Bagde Dies During Surgery in Pune
Sand Extraction Dispute Leads to Stone Pelting Incident in Rural Rampur
Marathi News Esakal
www.esakal.com