esakal | पाठकबाई म्हणाल्या, रोहितदादाच मतदारसंघाचे राणादा, महाराष्ट्र सुंदर करण्यासाठी पुढाकार घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Actress akshaya deodhar was present in the cleanliness awareness program in karjat jamkhed.jpg

अक्षया देवधर म्हणाल्या, 'प्रत्येकाने घरापासून स्वच्छतेला सुरूवात करा, लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावा, मी परत जामखेड शहर पाहण्यासाठी येणार आहे'.

पाठकबाई म्हणाल्या, रोहितदादाच मतदारसंघाचे राणादा, महाराष्ट्र सुंदर करण्यासाठी पुढाकार घ्या

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर ) : कर्जत-जामखेडमध्ये सुरु असलेल्या स्वच्छतेचा 'जागर' आणि राज्यातील इतर शहरांच्या स्वच्छतेसाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घ्यावा, अशी 'साद' सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांनी घातली आणि कर्जत-जामखेडची मान राज्यात उंचावणार ही दोन्ही शहर राज्याच्या नकाशावर 'रोल माँडेल' ठरणार तर आमदार रोहित पवार हे स्वच्छतेचे 'आयडाँल' ठरणार हे मात्र निश्चित !

कोणतं ही काम मन लावून केलं, त्या कामात झोकून दिलं, तसेच ते काम मिशन म्हणून हाती घेतलं तर परिवर्तन नक्की होणारचं. असंच काही अवघड असलेले स्वच्छतेचे काम आमदार रोहित पवार यांनी हाती घेतलं आहे. त्यांना मातोश्री सुनंदाताईची साथ मिळाली आणि बदलाच्या दिशेने पाऊलं पडू लागले आहेत. आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर असाव हा ध्यास उराशी बाळगूनच आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार हे काम करीत आहेत. 

त्यांनी सोमवारी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील कलाकार (अभिनेत्री) अक्षया देवधर व स्वच्छता दुत गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत 'स्वच्छतेचा जागर' हा जामखेड शहरात वळविला. यानिमित्ताने त्यांनी झोपी गेलेल्या जामखेडकरांना जागे केले, जागे झालेल्यांना बोलते केले आणि बोलते झालेल्यांना धावते केले, हे मात्र निश्चित. 

यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांची शहरासाठीची व स्वच्छतेसाठी असलेली तळमळ पाहून आक्षया देवधर म्हणाल्या, आमदार रोहित दादा हेच या मतदारसंघाचे खरे राणादा आहेत. त्यांनी कर्जत-जामखेड बरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही स्वच्छतेचे काम करावे, त्यांच्यात ती धमक आहे. ते 'स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र' करू शकतात.

'स्वच्छ जामखेड, सुंदर जामखेड व हरित जामखेड' याकरिता लोकसहभाग वाढवण्यासाठी अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या उपस्थितीत स्वच्छतेच्या अभियानाचा जागर आमदार रोहित पवार व सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार यांच्या उपस्थितीत झाला, यावेळी देवधर बोलत होत्या.

यावेळी नगरपरपालिकेच्या प्रशासक तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे, केंद्र शासनाने स्वच्छता दूत गणेश शिंदे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे संचालक रमेश आजबे, कर्जत-जामखेडचे विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, अमोल गिरमे, लक्ष्मण ढेपे सह नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अक्षया देवधर म्हणाल्या, 'प्रत्येकाने घरापासून स्वच्छतेला सुरूवात करा, लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावा, मी परत जामखेड शहर पाहण्यासाठी येणार आहे'.

आमदार रोहित पवार म्हणाले, जामखेड शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच चांगले रस्ते, बागा, क्रिंडागणे व अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहोत. येत्या तीन वर्षांत जामखेडचा चेहरा-मोहरा बदलून 'स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड' होणार आहे. तुम्ही नातेवाईकांना जामखेड दाखवण्यासाठी आणणार आहात.

यावेळी केंद्र शासनाचे स्वच्छता दूत गणेश शिंदे यांनी स्वच्छता व शौचालय याचे महत्त्व सांगितले. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी प्रास्ताविकात लोकचळवळ वाढावी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक संस्था व पदाधिकारी यांना स्वच्छ सर्वेक्षण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

कर्जतचे 'ते' ६० तरूण ठरले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 

स्वच्छतेचा संदेश देत कर्जतचे ६० तरुण सायकलवर जामखेडला आले होते. त्यांनी येथील नागरिकांशी सुसंवाद साधला. कार्यक्रम स्थळी स्वच्छतेचा जागर करणाऱ्या घोषणा दिल्या आणि परिसर दुमदुमून गेला. मुख्याधिकारी गोविंद जाधव, बिजेएसचे जिल्हाध्यक्ष अशिष बोरा यांनी कर्जतमध्ये होत असलेल्या स्वच्छता चळवळीची माहिती दिली. स्वच्छता चळवळ लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

loading image