
Radial Keratotomy Technology : चष्मा घालविण्याचे अत्याधुनिक तंत्र
Radial Keratotomy Technology : अहमदनगरचे लेसर नेत्रशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया यांनी १९८५ मध्ये रशियाला जाऊन डॉ. फेदरोव्ह यांच्याकडून रेडियल कॅरेटोटॉमी हे तंत्रज्ञान शिकून आल्यानंतर अहमदनगरला साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेची स्थापना केली.
भारताच्या नेत्रशास्त्रामध्ये इतिहास घडविला. अहमदनगरसारख्या लहान गावाकडे संपूर्ण भारतातून व बाहेरच्या देशांतूनही रुग्ण येऊ लागले. त्यानंतर १९८८ मध्ये मोतीबिंदूसाठीचे अत्याधुनिक फॅको-इमल्सीफिकेशन तंत्रज्ञान विकसित केले.
सन १९९० मध्ये ऑटोमेटेड लॅमिलर कॅरॅटोप्लास्टी, तर १९९५ मध्ये लॅसिक शस्त्रक्रियेचा उपयोग सुरू केला. त्यावेळी सॉलिड स्टेट लेझरवर आशिया खंडात पहिल्यांदा लॅसिक शस्त्रक्रिया अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवामध्ये होऊ लागली.
त्यानंतर व्हेवफ्रंट गाइडेड लेसर ट्रीटमेंट, आयसीएल, रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्स्चेंज, केरॅटोकोनस ट्रीटमेंट, एपिलॅसिक अशा अनेक शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी एकाच छताखाली असणारे डॉ. कांकरियांचे साई सूर्य नेत्रसेवा हे भारतातील पहिले दालन ठरले.
आता त्यांचे चिरंजीव डॉ. वर्धमान कांकरिया व डॉ. श्रुतिका कांकरिया यांच्याबरोबर पुणे येथील एशियन आय हॉस्पिटलची उभारणी करून स्टाइल, फ्लेम्टो लॅसिक, झेप्टो लेसर मोतीबिंदूचे मल्टी फोकल तंत्रज्ञान
भारतात प्रथम आणण्याचा पराक्रमही केला..
डॉ. कांकरिया यांनी आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया केल्या आहेत. जगात प्रथमच ८ तासांत १५० पेक्षाही अधिक लॅसिक नेत्रशस्त्रक्रिया त्यांनी केल्या असून, आतापर्यंत हा विक्रम ५० पेक्षाही अधिक वेळा केला आहे. त्यामुळे त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मानही मिळाले आहेत.
दृष्टिदोषाचे प्रमाण मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे चष्मा घालण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढते आहे. पूर्वी आपल्या शाळेत चार ते पाच मुलांना चष्मे असायचे. त्यांना कंदील म्हणून चिडवायचे.
आता प्रत्येक वर्गात दहा ते १५ ‘कंदील’ दिसू लागले आहेत. लहानपणी दृष्टीचा विकास होत असताना वाढता टेलिव्हिजन, व्हिडिओ गेम, संगणकाचा उपयोग, मोबाईल, बारीक प्रिंटची पुस्तके यांमुळे अतिरिक्त ताण पडतो. कमी वयात दृष्टिदोष निर्माण होऊन मोठी चिंताजनक परिस्थिती झाली आहे. चष्मा असणाऱ्या प्रत्येक माणसाला हा चष्मा नकोसा झाला आहे.