महापालिकेतील बाधित कर्मचाऱ्याला बेडच मिळेना 

corona peshant
corona peshant
Updated on

नगर : महापालिका प्रशासनाने दसरेनगर येथील आनंद लॉनमध्ये कोविड सेंटर थाटात सुरू केले. मात्र, हे सेंटर महापालिका कर्मचाऱ्यांसाठीच उपयोगी पडत नसल्याचे समोर आले आहे. साधी रुग्णवाहिकाही महापालिकेकडून न मिळाल्याने, महिला कर्मचाऱ्याला चक्‍क टेम्पोतून नातेवाइकांनी शहरातील विविध कोविड सेंटरमध्ये नेले; पण कुठेही जागा मिळाली नाही. तब्बल सहा तास शहरातील विविध रस्त्यांवर रुग्णाला घेऊन नातेवाईक फिरत होते. याबाबत नगरसेवक कुमार वाकळे यांना माहिती मिळाल्यावर, त्यांनी आमदार संग्राम जगताप यांना सांगितले. त्यानंतर या महिलेला जिल्हा रुग्णालयात जागा मिळाली. 

महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील आरोग्यसेविका असलेली महिला आज सकाळी कोरोनाबाधित आढळली. तिचा मुलगा व सुनेने रुग्णवाहिका बोलाविल्या. मात्र, एकही रुग्णवाहिका आली नाही. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हेही फोन घेत नसल्याने, महिलेच्या सुनेच्या भावाने थेट मित्राचा छोटा टेम्पोच आणला. त्यात मागे महिला कर्मचारी व तिच्या सुनेला बसविले. पुढे मुलगा व सुनेचा भाऊ बसले. सुनेच्या भावानेच टेम्पो चालवीत दुपारी 12 वाजता महापालिकेचे दसरेनगर येथील कोविड सेंटर गाठले. दोन तास थांबूनही महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये या महापालिका कर्मचाऱ्याला जागा शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. 

महापालिकेच्या कोविड सेंटरने महापालिका कर्मचाऱ्यांबरोबर आलेल्या नातेवाइकांना पीपीई किट देऊन तेथून न्यूक्‍लिअस हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला. न्यूक्‍लिअस हॉस्पिटलमध्ये दीड तास थांबूनही रुग्णासाठी जागा मिळेना. त्यामुळे रुग्णास जिल्हा रुग्णालयात आणले. तेथेही जागा नसल्याने वैतागून सुनेच्या भावाने नगरसेवक वाकळे यांना फोन केला. त्यांनी सर्व माहिती घेऊन, तातडीने आमदार जगताप यांना कळवले. आमदार जगताप यांचा फोन येताच, सायंकाळी सहा वाजता जिल्हा रुग्णालयात महिलेला जागा मिळाली. 


महापालिकेकडे दोन रुग्णवाहिका असतानाही, महापालिकेच्याच कर्मचाऱ्याला एकही रुग्णवाहिका मिळू नये, हे दुर्दैवी आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी. 
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, महापालिका कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com