कृषिमंत्री मानोरीतून साधणार राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

राज्यातील अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची इतर शेतकऱ्यांच्या शेतीला उत्पादन वाढीला आणि विविध प्रयोग करण्याला मदत व्हावी यासाठी राज्यभरातील आतापर्यंतचे कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार केली आहे.

नगर : प्रयोगशील शेतकऱ्याची जिल्ह्याच्या शेतीविकासासाठी मदत व्हावी, यासाठी कृषी विभागाने केलेल्या रिसोर्स बँकेतील राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्याशी उद्या सोमवारी (ता. 7) कृषीमंत्री दादा भुसे आॅनलाईन संवाद साधणार आहेत.

कृषीभूषण डाॅ. दत्तात्रय वने यांच्या शेतात मानोरी ता. राहुरी येथे हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांना या बाबत कृषी विभागाने माहिती दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

राज्यभरातील विविध प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवून शेती उत्पादन घेत आहेत. अशा शेतकऱ्यांचा राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून कृषिभूषण सह विविध पुरस्कार देऊन गौरव केला जातो.

राज्यातील अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची इतर शेतकऱ्यांच्या शेतीला उत्पादन वाढीला आणि विविध प्रयोग करण्याला मदत व्हावी यासाठी राज्यभरातील आतापर्यंतचे कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार केली आहे.

या रिसॉर्ट बँकेतील राज्यभरातील शेतकऱ्यांची उद्या सोमवारी ता. 7 राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे ऑनलाईन संवाद साधणार आहेत. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील प्रयोगशील शेतकरी कृषिभूषण डाॅ. दत्तात्रय वने यांच्या शेतात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होत असून नगर जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त व प्रगतशील 150 शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आली आहे.

भुसे इथूनच राज्यभरातील शेतकऱ्याची ऑनलाईन संवाद साधतील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान राज्य शासनाच्या कृषी विभागाने रिसॉर्ट बँकेच्या माध्यमातून राज्यभरातील प्रयोगशील व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना एकत्र करून शेती हिताचा उपक्रम राबवला जात आहे. मात्र नगरच्या कृषी विभागाला याचे फारसे देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील अनेक का व प्रयोगशील शेतकऱ्यांना निमंत्रणच दिली नसल्याची बाब समोर आली आहे. हा कार्यक्रम प्रसिद्धीमाध्यमांना पासून अधुर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे रिसर्च बँकेच्या माध्यमातून होणारी प्रगती नगरच्या कृषी आणि आत्मा विभागाला नको आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister will interact with farmers in the state from Manori