
संगमनेर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांनी अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत एकूण ७३ गोवंश जनावरे ताब्यात घेतली असून, १७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईतून शहरात राजरोसपणे अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे वास्तव उघड झाले आहे.