
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीत झाली. या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ६८१ कोटींच्या चौंडी विकास आराखड्याचा शासन निर्णय लवकरच जाहीर होईल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केला.