

Ahilyanagar
esakal
शांताराम काळे
अकोले: ‘‘बाबा, दारू विकू नका’’... आपल्या चिमुकल्या लेकीच्या या निरागस बोलाने वडिलांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. शाळेत दारू विकणाऱ्याची मुलगी अशी हेटाळणी सहन करावी लागत असल्याने लेकीने वडिलांकडे दारुविक्री बंद करण्याचा भावनिक आग्रह धरला. या शब्दांनी अंतर्मुख झालेल्या लिंगदेव (ता. अकोले) येथील पिनू (शंकर) आढाव यांनी अवैध दारुविक्रीचा व्यवसाय कायमचा बंद करून स्वाभिमानाने मासेविक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला.