मराठा समाजातील (Maratha Community) आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा विकास घडवून आणण्यासाठी १९९८ मध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
अहिल्यानगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या (Annasaheb Patil Mahamandal) अहिल्यानगर कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत १३ हजार ५४२ सुशिक्षित तरुणांना कर्ज देऊन रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी केले आहे. १ हजार २६ कोटी ७० लाख ९२ हजार ५७१ रुपयांचे व्यवसायासाठी कर्ज वाटप केले आहे.