
अहिल्यानगर : अहिल्यानगर- बीड- परळी रेल्वेमार्गावरील विघनवाडी ते बीड अंतरावरील रेल्वे चाचणी यशस्वी झाली. या मार्गावर ताशी १३० किमी वेगाने रेल्वे यशस्वीपणे बुधवारी धावली. अहिल्यानगर ते बीडपर्यंत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे.