
अहिल्यानगर : महावितरण कंपनीने शुक्रवारी घेतलेल्या शटडाऊनमुळे शहर व उपनगरांचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित झाला आहे. या शटडाऊनमुळे मुळानगर व विळद येथून पाणी उपसा करता आला नाही.
शुक्रवारी सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर पाणी योजनेवरील पाणी उपसा सुरू झाला असला, तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठा वेळ लागला. परिणामी दोन दिवसानंतरही शहरासह उपनगरातील काही भागात पिण्याचे पाणी आले नाही.