.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अहिल्यानगर : जुन्या वादाचा मनात राग धरून आठ जणांनी तरुणाला शिवीगाळ करून चाकूने वार करून, त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील इम्पिरियल चौकाजवळील एस. एस. मोबाईल शॉपीजवळ शुक्रवारी (ता. ३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. विशाल राजेंद्र भंडारी (वय २३, रा. समृद्धीनगर, वाकोडी रोड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.