अहिल्यानगर : मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी (ता.२९) एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. तरुणावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. .Rahul Narvekar : पाच डिसेंबरला राज्यात नवे सरकार : राहुल नार्वेकर.दरम्यान, जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जिशान रुस्तमअली खान (वय १८, रा. घर नं २३, इस्लामी बेकरीजवळ, दर्गा दायरा रोड, मुकुंदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) यास अटक केली आहे..जिशान रुस्तमअली खान, आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान व रेहान अब्दुलहक शेख, फैजान सोहराबअली खान (दोघे रा. मुकुंदनगर) असे चौघेजण मुकुंदनगरमधील एका औषधाच्या दुकानात गप्पा मारत होते. एकमेकांची चेष्टा, मस्करी करत असताना त्याचा यातील आरोपी शमशुद्दीन यास राग आल्याने त्याने दुकानामधील काउंटरवरील कात्री हातात घेऊन काउंटरच्या आतमध्ये येत जिशान याच्या पाठीवर सपासप वार केले..त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाचा त्याचा मृत्यू झाला. .Srirampur Crime : साजन पाचपुतेंसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा.घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी घटनास्थळी भेट दिली. मृताचा भाऊ नसीब अली रुस्तमअली खान यांनी फिर्याद दिली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.