

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६१.९५ टक्के मतदान झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंत केंद्रांवर रांगा होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.