
अहिल्यानगर : जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम आहे. दक्षिण भागातील श्रीगोंदे, पाथर्डी, नेवासे, अहिल्यानगर तालुक्यातील बहुतांश गावाला शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने झोडपले. चोवीस तासात १२ महसूल मंडळात अतिवृष्टी, तर १५ मंडळात जोरदार पाऊस झाला. कोळगाव (ता. श्रीगोंदे) मंडळात सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.