
-संतराम सूळ
चौंडी (ता. जामखेड) : ग्रामीण भागात होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीकडे अहिल्यानगर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ही बैठक केवळ दिखावा ठरणार की त्यातून काही हाती लागणार याची उत्सुकता होती. परंतु ही बैठक सर्वार्थाने ऐतिहासिक ठरली. राज्यासाठी पाच हजार, तर जिल्ह्यासाठी तब्बल बाराशे कोटींचा निधी देऊन गेली. अहिल्यानगरमध्ये मेडिकल कॉलेज, राहुरीत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि चौंडीत अहिल्यादेवींवर शिल्पसृष्टी उभी राहणार आहे.