
अहिल्यानगर : नगर अर्बन बँकेच्या विविध शाखांमधील लॉकर्सबाबत वारंवार जाहीर निवेदने दिल्यानंतरही, तसेच संबंधित लॉकर्सधारकांना नोटिसा पाठवून संपर्क करण्याचे प्रयत्न केले आहेत. भाडे भरण्यासाठी संबंधित लॉकरधारक अथवा त्यांचे कायदेशीर वारस हे पुढे न आल्याने अखेर १३२ लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष उघडण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.