
अहिल्यानगर : पोलिस प्रशासनाने सरत्या वर्षात १७ आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांची रवानगी नाशिक कारागृहात केली आहे, तर चार गुन्हेगारी टोळ्यांतील २७ जणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला मोठा आळा बसला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.