.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अहिल्यानगर : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने टाकलेल्या पावलाला महावितरणच्या अहिल्यानगर मंडळातील १८ हजार ८९५ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी छापील वीजबिल नाकारून ऑनलाईन सेवेच्या पर्यायाचा वापर सुरू केला आहे. गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपयांप्रमाणे एकूण १८ हजार ८९५ ग्राहकांची २२ लाख ६७ हजार ४०० रुपये इतकी वार्षिक बचत होत आहे.