
अहिल्यानगर : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड किंवा बनावट नंबरप्लेटचा वापर करून अनेकदा गुन्हे केले जातात. त्याचबरोबर त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची ओळख पटत नाही. त्याचा विचार करून परिवहन विभागाने नंबर प्लेटमध्ये होणारी बनवाटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख तत्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व वाहनधारकांना ती नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांवर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे.