

-सतीश वैजापूरकर
शिर्डी : गेल्या वीस वर्षांपासून खड्ड्यात हरवलेला अहिल्यानगर ते सावळीविहीर हा राष्ट्रीय महामार्ग काँक्रीटचा नव्हे, तर डांबरी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता काँक्रीटचा करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, आता हा रस्ता डांबरी केला जाईल. दोन वर्षांत काम पू्र्ण करण्याच्या अटीवर ७०१ कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी चौदा ठेकेदारांनी निविदा भरल्या. या निविदांची छाननी सुरू आहे. येत्या दहा दिवसांत ठेकेदार कंपनीचे नाव निश्चित होईल आणि पुढील महिनाभरात कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.