Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात पारा ४१.०१ वर: सूर्य आग ओकतोय; कडक उन्हामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट
Ahilyanagar Temperature : उष्णतेच्या या तीव्रतेमुळे दीर्घकाळ बाहेर राहणे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. या महिन्यात यात्रा सुरू होत आहेत. उन्हाची काहिली अशीच राहिली, तर यात्रांवर त्याचा परिणाम होऊ शकेल.
Ahilyanagar streets deserted in the afternoon as temperature hits 41.01°C; heatwave intensifies.Sakal
अहिल्यानगर : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. ९) पारा ४१.०१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडक उन्हामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट होत आहे.