
अहिल्यानगर : व्यापाऱ्याकडे पोहोच करण्यासाठी दिलेल्या सुमारे सव्वासहा लाख रुपये किमतीच्या १२ टन कांद्याची मालट्रक चालकाने परस्पर विल्हेवाट लावत अहिल्यानगरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मालट्रक चालकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.