
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारा पहिलवान आपल्याकडे झाला नाही. त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचे नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे.