Ahmednagar : माजी सैनिकाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास

मंगळवारी वरातीचा कार्यक्रम संपल्यानंतर महिलांनी सर्व दागिने काढून घरातील कपाटात ठेवले होते.
Ahmednagar news
Ahmednagar news sakal
Updated on

अहमदनगर - चोरट्यांनी माजी सैनिकाच्या घरातून तब्बल १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी (ता. ३०) पहाटे तीनच्या सुमारास बाबुर्डी घुमट येथील पाटील मळा वस्तीवर घडली. याप्रकरणी माजी सैनिक दत्तात्रय श्रीहरी माने यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी माने यांच्या भाच्याचा मंगळवारी (ता. २९) बाबुर्डी बेंद येथे विवाह होता. त्यामुळे सर्व दागिने कुटुंबातील महिलांजवळच होते. मंगळवारी वरातीचा कार्यक्रम संपल्यानंतर महिलांनी सर्व दागिने काढून घरातील कपाटात ठेवले होते.

Ahmednagar news
Raigad: कोट्यवधींची फसवणूक, न्यायासाठी शेतकऱ्यांचा लढा

पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील १८ तोळ्यांचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला.

Ahmednagar news
Mumbai News : डोंबिवली मधील टिळक सिनेमागृहाचे मालक मोरारजी विरा यांचे निधन

शेजारच्या घरावर असलेला सीसीटीव्ही कॅमेरादेखील त्यांनी चोरून नेला. चोरट्यांनी गांगर्डे वस्तीवरदेखील चोरीचा प्रयत्न केला होता. नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dharashiv Drug Bust Ganja And Charas Seized Along With 22 Tola Gold And Cash Worth Nearly 70 Lakh In Police Raid
सराफ व्यापाऱ्याला लुबाडले
Yavatmal
solapur city gold theft
Marathi News Esakal
www.esakal.com