
एकूण वीस हजार 418 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दोन हजार 773 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यावेळी 19 कोटी दोन लाख 67 हजार 703 रुपये रक्कम वसूल करण्यात आली.
नगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनांतर्फे जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लोकन्यायालयास जिल्ह्यातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, न्या. ए. एम. शेटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, ऍड. सुभाष काकडे, ऍड. भूषण बऱ्हाटे आदी उपस्थित होते.
लोक न्यायालयात जिल्हा न्यायालयात दिवाणी प्रकरणे, फौजदारी, एन. आय. ऍक्ट प्रकरणे, बॅंकांच्या कर्ज वसुली प्रकरणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे आदी प्रकरणे समझोता करिता ठेवण्यात आली होती.
यामध्ये एकूण वीस हजार 418 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दोन हजार 773 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यावेळी 19 कोटी दोन लाख 67 हजार 703 रुपये रक्कम वसूल करण्यात आली.