मराठा आरक्षण समितीच्या इशाऱ्यामुळे उद्या ‘हा’ महामार्ग बंद

सुनील गर्जे
Wednesday, 22 July 2020

मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने २०१८ मध्ये  गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले होते.

नेवासे (अहमदनगर) : मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने २०१८ मध्ये  गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले होते. या घटनेला गुरुवारी (ता. २३) दोन वर्षं होत आहेत. त्यानिमित्त शिंदे यांना श्रद्धांजली व मराठा आरक्षण समितीने आंदोलनाचा दिलेल्या इशाऱ्यामुळे येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर जिल्हा पोलिसांनी गुरुवारी (ता. २३) नगर- औरंगाबाद महामार्ग बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुण आंदोलकाने २३ जुलै २०१८ नगर- औरंगाबाद जिल्ह्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत उडी मारून बलिदान दिले होते. या दिवशी शिंदें यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून हजारो मराठा क्रांती मोर्चाचे कार्येकर्ते येत असतात. ही गर्दी व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी याच दिवशी नगर- औरंगाबाद महामार्गावरील शिंदे सेतू पुलावर बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने नगर जिल्हा पोलिस प्रशासनाने नगर- औरंगाबाद महामार्ग औरंगाबादकडे जाण्यासाठी गुरुवारी (ता. २३) पहाटे पाच ते सायंकाळी सातवाजेपर्येंत अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहने वगळून वाहातुकीस बंद ठेवला आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाने नगर- नेवासे फाटा मार्गे औरंगाबादला जाणारी वाहातून शेवगाव- पैठण मार्गे औरंगाबाद अशी वळलेली आहे.

  • अशी राहणार  वाहतूक
  • नगरकडुन औरंगाबादकडे जाणारे वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग असा : 
  • ▪️ नगर - नेवासे फाटा - कुकाणे - शेवगाव - पैठण - बिडकिण मार्गे औरंगाबाद. 
  • ▪️ नगर - घोडेगाव - कुकाणे- शेवगाव - पैठण - बिडकिण मार्गे औरंगाबाद
  • ▪️औरंगाबाद कडुन नगर कडे येणारे वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग : औरंगाबाद - बिडकिण - पैठण - शेवगाव - मिरी - पांढरी पुल मार्गे नगर
  • नेवासेचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे म्हणाले, जिल्हा पोलिस प्रमुख अखिलेश कुमार सिह यांच्या आदेशाने नगर- औरंगाबाद वाहतकीचे नियोजन केले असून नेवासे हद्दीत सुमारे चाळीस पोलीस व दहा अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.  औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी या दिवशी प्रशासनाने दिलेल्या नियोजित मार्गाचा अवलंब करावा.
  • संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar to Aurangabad highway will remain closed on Thursday