भाजपकडून 'जाती-धर्मांत' भांडणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde

भाजपकडून 'जाती-धर्मांत' भांडणे

कर्जत : भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच जाती-जाती, धर्मा-धर्मांत भांडणे लावायची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, प्रयत्न सुरू आहे. मात्र महाविकास आघडी सरकार स्थित होते व स्थिर राहील, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

तालुक्यातील ११८ गावांत आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सहाय्य योजना लाभार्थी शोध मोहीम राबविण्यात आली. त्यातील पात्र तीन हजार ११८ लाभार्थ्यांना मुंडे यांच्या हस्ते व आमदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आदेश प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, सभापती मनीषा जाधव, उपसभापती राजेंद्र गुंड, समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमृत खराडे, सदस्य बापूसाहेब नेटके, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, भाजपने राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा कुठलाही प्रयत्न सोडलेला नाही. प्रयत्न करूनही राज्य सरकार पडत नाही, म्हणून जाती-जातींत, धर्मा-धर्मांत भांडणे लावायची आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, हा अजेंडा भाजपकडून राबविला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला.

आमदार पवार म्हणाले, निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबरोबरच मतदारसंघातील जनतेला जास्तीचे काय देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध वैयक्तीक लाभाच्या योजना ज्यांच्यापासून कोसो दूर होत्या, त्या पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना लाभ मिळवून दिला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखे स्वर्गीय सुख नाही. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी प्रास्ताविक केले, तर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आभार मानले.

राजकारणापाई महागाई विसरलो

आज आपण महागाई किती झाली ते विसरलो आहोत. राज्यात काय समस्या आहेत, ते विसरलो. आत काय सुरू आहे तर भोंगा लावावा की नाही, कुणाला हनुमानचालिसा येतो की नाही, ज्याला हनुमानचालिसा येते तो देशप्रेमी, नाही येत तो देशद्रोही, यावर राजकारण सुरू आहे. त्यामुळे सध्या राज्यात काय सुरू आहे, असा प्रश्न पडतो, असा संताप मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

जनतेला त्रास दिला, तर याद राखा

मतदारसंघात गट, तट, पक्ष न पाहता सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही अधिकारी अत्यंत उत्तम काम करीत आहेत. मात्र काही अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करावी. जनतेला त्रास द्याल तर याद राखा, असे सूचक विधान आमदार रोहित पवार यांनी केले.

Web Title: Ahmednagar Bjp Caste Religion Quarrel Dhananjay Munde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top