esakal | माजी केंद्रीय राज्यमंत्री, भाजप नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

dilip gandhi.jpg

दिलीप गांधी हे सलग तीन वेळा नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले.

माजी केंद्रीय राज्यमंत्री, भाजप नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अहमदनगर- माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी (वय 70)यांचे दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान आज (दि.17) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे.

दिलीप गांधी मंगळवारी रुग्णालयात दाखल झाले होते. तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. दिलीप गांधी हे सलग तीन वेळा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. 2003 ते 2004 या काळात केंदातील अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. गत लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकरली.

हेही वाचा -  थोडं थांबा, तुमची बँकेतील प्रकरणं बाहेर काढतो

त्यांना कोरोना संसर्ग झाला असल्याने त्यांच्या पार्थिवावर दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचे वडील होत.

गांधी यांची कारकीर्द

भाजप पक्ष वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अगदी वाड्या-वस्त्यांवर जाऊन त्यांनी पक्षासाठी काम केले. पहिल्यांदा खासदार झाल्यानंतरच खासदाराचे काय काम असते, हे लोकांना कळाले. त्यांची जनसामान्यांमध्ये मोठी क्रेझ होती. भाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक ते थेट खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला. पक्षासोबत एकनिष्ठ असतानाही त्यांचे दोनदा तिकिट कापण्यात आलं होतं. एकदा राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख निवडून आले होते. दुसऱ्यांदा पक्षाने चूक सुधारली आणि गांधी निवडून आले. मागील निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले. इतर पक्षांकडून त्यांना अॉफर होत्या. परंतु त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही. गांधी यांचा जन्म ९ मे १९५१ साली दौंड येथे झाला होता.