Rahuri Credit Card Fraud: बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणारे ठकसेन अटकेत, पॅन कार्डचा वापर करुन 'असा' करायचे अपहार

इतरांचे आधारकार्ड, पॅनकार्ड मिळवून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करायचे. त्यावर व्यवहार करून हजारो रुपयांचा अपहार करायचा.
Rahuri Credit Card
Rahuri Credit Card Esakal

Credit Card Fraud: इतरांचे आधारकार्ड, पॅनकार्ड मिळवून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करायचे. त्यावर व्यवहार करून हजारो रुपयांचा अपहार करायचा. त्यांचा सिबिल खराब करायचा, या गुन्ह्यातील तीन जणांच्या टोळीला राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.

नवाब ऊर्फ सोनू हबीब सय्यद (वय ३०, रा. महादेववाडी, ता. राहुरी), असलम ऊर्फ भय्या चांद पठाण (रा. राहुरी), कारभारी देवराम गुंड (वय २८, मूळ रा. कुक्कडवेढे, हल्ली मांजरी बु., जि. पुणे) अशी वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

राहुरी पोलिस ठाण्यात किरण बाजीराव चिंधे (वय ३२, रा. टाकळिमियाँ) यांनी १० फेब्रुवारी २०२४ रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. अनोळखी इसमाने पॅनकार्डवरील पत्ता बदलून बनावट ई-मेल आयडी तयार करुन बँकेत खाते उघडले. बँकेचे क्रेडिट कार्ड घेऊन त्यावरून ७५ हजारांचा व्यवहार केला. (Latest Marathi News)

परंतु, त्याचा हप्ता न भरल्याने त्याचे व्याजासह ८३ हजार ८३१ रुपये माझ्या खात्यावर कर्ज दिसत आहे, अशी फिर्याद होती. या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना ताब्यात घेतले, असे पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी सांगितले.

Rahuri Credit Card
Manoj Jarange : ''पूर्वी आत्या कान भरायची, आता फडणवीस भरतात'' जरांगेंचे फडणवीसांवर आणखी गंभीर आरोप

आरोपींकडे चौकशी केली असता, त्याने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड मिळवून त्यावरील माहिती मोबाईलमधील ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कशाप्रकारे बदलण्यात येते, याची माहिती दिली. बनावट कागदपत्रांद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून त्यावर कशाप्रकारे पैसे काढून आर्थिक फायदा मिळविता येतो, याचीही माहिती आरोपींनी दिल्याचे ठेंगे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड वापरून संबंधितांच्या नावाने क्रेडिट कार्ड तयार करून परस्पर फायदा लाटून नागरिकांचे सिबिल खराब केले असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने अटक केलेल्या आरोपींकडे तपास करीत आहे.- संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक

Rahuri Credit Card
Devendra Fadnavis Death Threat: देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला साताऱ्यातून अटक, आरोपीला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com