अहमदनगर : क्षयरोग निर्मूलनात जिल्हा अव्वल

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्णपदकासह पाच लाखांचे पारितोषिक
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक व  पाच लाखांचा पुरस्कार प्रदान केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक व पाच लाखांचा पुरस्कार प्रदान केला आहे. sakal

अहमदनगर: क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात जिल्ह्याने उल्लेखनीय काम केलेले आहे. या कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक व पाच लाखांचा पुरस्कार प्रदान केला आहे. जागतिक क्षयरोग निदान दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविये, कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते डॉ. भागवत दहिफळे व डॉ. प्रशांत जायभाये यांनी सुवर्णपदक व पाच लाखांचे बक्षीस स्वीकारले.

दर वर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने सन २०२०पासून देशातील क्षयरुग्णांचे प्रमाण घटले आहे किंवा कसे, यासाठी देशभरातून जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्‍ट्रातील एकूण १३ जिल्हे सहभागी झाले होते. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश होता. अहमदनगर जिल्ह्यात दहा हजार घरांचे सर्वेक्षण व साधारणत हजार व्यक्तींचे क्षयरोगाविषयीचे ज्ञान व त्यावरून ३५० क्षयरुग्णांचे थुंकी नमुने सूक्ष्मजीव शास्त्रीय तपासणी करता पाठविण्यात आले. त्यामधून १६ सक्रिय क्षयरुग्ण उपचाराखाली आणण्यात आले.

ही मोहीम १९ फेब्रुवारी ते नऊ मार्च २०२२पर्यंत स्वयसेवकांमार्फत राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये क्षयरुग्ण संख्या सन २०१५ पासून ते २०२१पर्यंत ६० टक्के नवीन रुग्णांची घट झाल्याचे निष्कर्ष केंद्रस्तरीय समितीने नोंदविले. त्यानुसार राज्यातून सहभागी झालेल्या १३ जिल्ह्यांपैकी अहमदनगर जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक व पाच लाखाचे रोख बक्षीस प्राप्त झालेले आहे. कोरोना काळात क्षयरोग निर्मूलनाचे कामकाज उत्कृष्टरीत्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेले आहे. या कामाचे पुरस्कार रूपाने मिळालेले फळ आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सांघिक कार्यामुळे हे यश मिळाले आहे.

-डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद.

यांनी केले कौतुक

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. अविनाश आहेर आदींनी क्षयरोग विभागाच्या कामाचे कौतुक केले आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com