Drought Relief: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाचे वितरणाचे नियोजन, पावणेतीन लाख क्विंटल धान्यसाठा मंजूर

Ahmednagar Food Grain Supply, Drought Relief, Ration Distribution: अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ साठी २ लाख ८५ हजार ३७८ क्विंटल अन्नधान्याच्या उचलीस मंजुरी देण्यात आली आहे.
Ahmednagar’s Supply Department plans food grain distribution for eligible ration cardholders amid drought-like conditions.

Ahmednagar’s Supply Department plans food grain distribution for eligible ration cardholders amid drought-like conditions.

esakal

Updated on: 

अहिल्यानगर: पर्जन्यमानातील तूट आणि त्यातून निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ वेळेत आणि विनाविलंब मिळावा, यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य उपलब्ध करून देणे, अन्नधान्य वितरणात पारदर्शकता राखणे आणि दुष्काळाच्या काळात नागरिकांना दिलासा देणे, यासाठी पुरवठा यंत्रणा कार्यरत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्याची उपलब्धता, साठवणूक, उचल आणि रास्तभाव दुकानांमार्फत वितरण या सर्व बाबींचे नियोजन करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com