Ahmednagar : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या अनुषंगाने नेवासे येथे आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते.
radhakrushna vikhe
radhakrushna vikhe sakal

नेवासे शहर - राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक व गंभीर असून स्वतः मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या अनुषंगाने नेवासे येथे आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर, भाऊसाहेब फुलारी, अंकुश काळे, ज्ञानेश्वर पेचे आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले की, मागील काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयही टिकवले होते. मात्र, अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीमुळे ते गेले.

radhakrushna vikhe
Maratha Reservation : वातावरण तापलं! चुलीत गेला पक्ष अन् चुलीत गेले नेते; साताऱ्यातील 'या' गावांत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास बांधील असून आंदोलनकर्त्यांची दखल नक्कीच घेऊ. मी जे बोलतो ते करून दाखवतो. शिर्डी येथे होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही ऐतिहासिक सभा होणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातून अनेक नागरिक सभेस येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com