
अहमदनगर : विरोधकांनो, कान फुंकू नका; मधुकर पिचड
अकोले : गोवारी समाजाला आदिवासी आरक्षण मिळावे म्हणून मोर्चा निघाला. त्यात ११२ लोक मारले गेले. त्यावेळी सरकार वाचावे, यासाठी माझी जबाबदारी नसताना मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांचे तालुक्यातील विरोधकांनी कितीही कान फुंकले, तरी ते त्यास भीक घालणार नाहीत, याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.
राजूर येथे कार्यकर्ता स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, सुनील दातीर, यशवंत आभाळे, बाळासाहेब वडजे, मुरलीधर भांगरे, काशिनाथ साबळे, सीताराम भांगरे उपस्थित होते.
माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, की सत्ता गेल्याने पदे जातील, या भीतीने काही जण विरोधकांना मिळाले. मात्र सर्वसामान्य, जिवाभावाचे कार्यकर्ते आजही आमच्यासोबत आहेत. त्यांना बरोबर घेत अधिक जोमाने काम करू.
माजी मंत्री पिचड म्हणले, की मी माझ्या कार्यकाळात जितकी कामे केली, त्यापेक्षा विरोधकांनी अधिक कामे करावीत. मी त्यांची पाठ थोपटीन, मात्र वैयक्तिक टीका करून तुम्ही काय साधणार आहात? तालुक्यातील मायबाप जनता सब जान ती हैं. १७ जूनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तालुक्यात येत आहेत. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंत आभाळे यांनी केले.
Web Title: Ahmednagar Gowari Community Tribal Reservation Movement 112 People Killed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..