Ahilyanagar Lok Sabha 2024: अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विखे विरुद्ध ‘मविआ’कडून पारनेरचे आमदार नीलेश लंके लढण्याची शक्यता

Ahilyanagar Lok Sabha 2024: अहमदनगरमधून भाजपने डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. ‘मविआ’कडून पारनेरचे आमदार नीलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नावाची चर्चा आहे.
Ahilyanagar Lok Sabha 2024
Ahilyanagar Lok Sabha 2024Esakal

Ahilyanagar Lok Sabha 2024: अहमदनगरमधून भाजपने डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. ‘मविआ’कडून पारनेरचे आमदार नीलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नावाची चर्चा आहे. २०१९ च्या निवडणुकीत डॉ. विखे यांच्या विरोधात आमदार संग्राम जगताप यांची लढत होती. पण आता आमदार जगताप या निवडणुकीत विखेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत. महायुतीच्या प्रचाराची धुराच त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे या निवडणुकीत जगताप यांचीही मते विखेंना मिळणार आहेत.

२०१९ चे चित्र

डॉ. सुजय विखे (भाजप) विजयी मते : ७,०४,६६०

संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ४,२३,१८६

नामदेव वाकळे (बहुजन समाज पक्ष) मते : ६६९२

काळीराम पोपळगट (भानसे) मते : ३३९२

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : २,८१,४७४

Ahilyanagar Lok Sabha 2024
Raigad Lok Sabha 2024: रायगड शिवसेनेला मिळणार? महायुतीत मित्रपक्षाच्या नाराजीमुळे सुनील तटकरेंची सावध भूमिका

वर्चस्व

२००४ : राष्ट्रवादी

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

Ahilyanagar Lok Sabha 2024
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024: औरंगाबादमध्ये तिरंगी लढत चुरशीची होणार? वंचित सोबत नसल्याने एमआयएमला फटका बसण्याची शक्यता

सद्य:स्थिती

सुजय विखेंकडून प्रचाराचे उत्तम नियोजन

विद्यमान खासदार असल्याने मागील विकासकामे जमेची बाजू

शिवाजी कर्डिले, प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप हे दिग्गज विखेंच्या मदतीला

कोरोनाकाळातील मदत हे लंकेचे बलस्थान

देवदर्शनामुळे महिला वर्गात लंकेंची प्रतिमा उजळली

सर्वसामान्यांशी, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क हे लंकेंचे बलस्थान

Ahilyanagar Lok Sabha 2024
Buldana Lok Sabha 2024: बुलढाण्यात फाटाफुटीने राजकीय चित्र धूसर; 25 वर्षांपासून शिवसेनेचा गड, मतदार कोणाला कौल देणार?

हे मुद्दे प्रभावी ठरणार

जिल्ह्यातील साकळाईची पाणी योजना केव्हा होणार

नगर शहर, कर्जत येथील औद्योगिक कामगारांचा प्रश्न

शेतीच्या पाण्याचा प्रश्न

शेवगाव- पाथर्डी साठीच्या पाणीयोजनेचा प्रश्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com