shani dev
shani dev sakal

Ahmednagar : शनीदेवाचे दोन लाख भाविकांकडून दर्शन ; वाहतूक कोंडी; लटकूंची पूजासाहित्य खरेदीसाठी दमबाजी

आज सकाळी नऊ वाजता दर्शनासाठी सुरू झालेली गर्दी दिवसभर टिकून होती. सकाळी दहा ते एक व सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत गावात अनेकदा वाहतूक कोंडी झाली.
Published on

सोनई - अनंत चतुर्दशी व इद-ए-मिलादची सुटी जोडून आल्यामुळे आज शनिवारी शनिशिंगणापूरला भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. पोलिस प्रशासनाने नियोजन केले नसल्याने गावात अनेकदा वाहतूक कोंडी झाली, तसेच रस्त्यावर व गावात लटकूंकडून होणाऱ्या सक्तीचा भाविकांना त्रास सहन करावा लागला. मात्र, कोणावरही कारवाई झाली नाही.

आज सकाळी नऊ वाजता दर्शनासाठी सुरू झालेली गर्दी दिवसभर टिकून होती. सकाळी दहा ते एक व सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत गावात अनेकदा वाहतूक कोंडी झाली. पोलिस ठाण्यापासून जवळच अनेक आरामबस रस्त्यावरच उभ्या करण्यात आल्याने इतर वाहनांना ये-जा करताना अडचण झाली. जिल्हा परिषद शाळा, शाखा परिसर, पानसनाला पूल, तसेच शिवांजली चौकात लटकूंनी भाविकांना सक्ती केली.

दुपारी माध्यान्हारती व सायंकाळच्या मुख्य आरती सोहळ्यास चौथऱ्याजवळ हजारो भाविक उपस्थित होते. येथे पोलिस कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केल्याने दर्शनव्यवस्था सुरळीत पार पडली. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने आज मोठी वाहने रस्त्यावर उभी करण्यात आली. रोज दंडात्मक कारवाईकरिता रस्त्यावर उभे राहणारे वाहतूक पोलिस कर्मचारी आज गर्दी नियंत्रणाकरिता रस्त्यावर दिसले नाहीत.

shani dev
Chh. Sambhaji nagar : पाणीटंचाईतून सुटका उन्हाळ्यातच ; नव्या योजनेतील नऊ जलकुंभ महापालिकेला मिळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com