Ahmednagar : रोजगार हमी योजनेची वाढली मजुरी

सुगीची कामे संपल्यानंतर शेतकरी, तसेच मजुरांना रोजगाराची गरज भासते
Mahatma Gandhi NREGA
Mahatma Gandhi NREGAsakal

अहमदनगर : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगार हमीच्या कामावर वाढ होऊ लागली आहे. सुगीची कामे संपल्यानंतर शेतकरी, तसेच मजुरांना रोजगाराची गरज भासते. त्यांना रोहयो कामांतून रोजगार उपलब्ध होतो. गेल्या पंधरा दिवसांत तब्बल पाच हजाराने मजूर संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यात ९ हजार ३७२ मजूर कामावर आहेत. दुष्काळी तालुक्यांत मजूरांची संख्या लक्षणीय आहे.

मग्रारोहयोअंतर्गत ग्रामीण भागात विविध कामांतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. फळबाग लागवड, रस्त्यांची कामे, गायी गोठ्याची कामे, वृक्षलागवड, घरकुलाची कामे, शोषखड्डे आदी कामांसाठी मजुरांची गरज भासते. ही कामे रोहयो योजनेतून केली जातात. संबंधिताला मजूर उपलब्ध होतात आणि मजुरांना रोजगार उपलब्ध होतो.

या दुहेरी हेतूने ही योजना चालवली जाते. मजुरांनी ग्रामपंचायत स्तरावर कामाची मागणी नोंदवायची असते. त्यानंतर त्यांना सरकारी यंत्रणेतून कामे उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे स्त्री आणि पुरूष अशा दोघांनाही एकच मजुरी दिली जाते. त्यातील दरात कोणताही भेदभाव केला जात नाही.

सध्या शेतकऱ्यांची शेतातील सुगीचे कामे आटोपली आहेत. त्यामुळे गावोगाव कामाची मागणी वाढत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात कामाची मागणी वाढत असते. यंदाही ग्रामीण भागात तीच स्थिती आहे. फेब्रुवारी महिन्यात हीच मजूर संख्या सहा हजाराच्या घरात होती.

आता ती साडेनऊ हजार झाली आहे. ग्रामपंचायत विभाग आणि महसूल यंत्रणेकडून ही कामे करून घेतली जातात. ग्रामपंचायत विभागाकडून तब्बल १ हजार ५११ प्रकारची कामे सुरू आहेत. त्यावर ६ हजार ३३८ मजूर काम करीत आहेत. यंत्रणेकडून ५१६ कामे केली जात आहेत. त्यावर ३ हजार ३४ मजूर आहेत.

जिल्ह्यात एकूण २ हजार २७ कामे सुरू आहेत. दुष्काळी भागातील जामखेड, कर्जत, पारनेर, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यांत मजुरांची संख्या लक्षणीय आहे.

तालुकानिहाय मजूर

अकोले ३८९, जामखेड १ हजार ९४८, कर्जत १ हजार ४८, कोपरगाव ४३७, नगर ६०५, नेवासा ५६३, पारनेर ९१२, पाथर्डी ७२८, राहाता १०६, राहुरी २४७, संगमनेर ६३४, शेवगाव ८२३, श्रीगोंदा ७५९, श्रीरामपूर १७३. सर्वाधिक मजूर जामखेड तालुक्यात आहेत.

तुटपुंजी वाढ

रोहयोवरील मजुरांना दररोज मिळणारा वाढला आहे. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. रोजगार वाढल्यानेही मजुरांची संख्या आणखी वाढू शकते. यापूर्वी मजुरांना २५६ रूपये दररोज मिळत होते. त्यात वाढ झाली असून आता हाच मजुरी दर २७३ रूपये झाला आहे. यावर्षी केवळ १७ रूपयांनी वाढली आहे. हा मजुरी दर वाढवण्याची मागणी होत आहे. स्त्री आणि पुरूषांसाठी मजुरीचा दर एकच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com