esakal | Mirajgaon : सीना धरणही भरले...
sakal

बोलून बातमी शोधा

मिरजगाव : सीना धरणही भरले...

मिरजगाव : सीना धरणही भरले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरजगाव : मागील अनेक महिन्यांपासून मिरजगाव व परिसरातील अनेक गावे प्रतीक्षा करीत असलेले सीना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. नदीपात्रातून सध्या १०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण भरल्याने शेतकरी आनंदले आहेत.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, या वर्षी धरण परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने ते भरेल की नाही, याबाबत साशंकता होती. मागील काही दिवसांपासून सीना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. अखेर हे धरण आज पूर्ण क्षमतेने भरले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस झाल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, धरण भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आकडे बोलतात

  • पाणीपातळी : ५८४.०१ (मीटर)

  • क्षमता : २४००.०० (दलघफू)

  • उपयुक्त साठा : १८४७.३३ (दलघफू)

एकूण साठा

  • आवक : ८८.६१ (दलघफू)

  • एकूण : १६४४.३२ (दलघफू)

  • सिंचन क्षेत्र : ८४४५ हेक्टर

  • लाभक्षेत्रातील तालुके : कर्जत, श्रीगोंदे, आष्टी

loading image
go to top