Ahmednagar: ‘तिची छेड काढली जातेय का?’ मुलींच्या संरक्षणासाठी नगर पोलिसांचा पुढाकार, मुलांना केले 'हे' आवाहन

शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढली जाऊ नये आणि काढलीच तर पुढे काय करावे? कशी मदत मिळवावी? यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मोहीम सुरू केली आहे.
Ahmednagar: ‘तिची छेड काढली जातेय का?’  मुलींच्या संरक्षणासाठी नगर पोलिसांचा पुढाकार, मुलांना केले 'हे' आवाहन
Updated on

Ahmednagar News: महिला-मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नगरच्या भाऊसाहेब फिरोदीया हायस्कुलमध्ये जनजागृती चर्चासत्र घेऊन ‘तिची छेड काढली जातेय का?’, या विषयावर चर्चासत्र घेतले व माहिती पत्रकांचे विद्यार्थ्यांना वाटप केले. विद्यार्थिनींनी यादव यांना तक्रारी सांगितल्या.

शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढली जाऊ नये आणि काढलीच तर पुढे काय करावे? कशी मदत मिळवावी? यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मोहीम सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे दिले. लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा काय आहे? याबाबत सविस्तर माहिती दिली.

तसेच मुलांनी कोणत्याही प्रकारे कोणत्याही मुलीची छेड काढू नये आणि असा काही प्रकार झाल्यास मुलींनी या प्रकाराला कसे सामोरे जावे? तक्रार कशी करावी? आपले नाव कसे गोपनीय राहील याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी तयार केलेले ऑनलाईन फसवणुकीबाबतचे पत्रकही वाटप करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचे उपप्रायार्य रावसाहेब बाबर, प्राध्यापिका आशा सातपुते उपस्थित होते.

मुलींकडून तक्रारींचा पाढा

कुणी काही त्रास देत असेल तर सांगा कारवाई करू, असे पोलिस निरीक्षक यादव यांनी आवाहन केल्यानंतर मुलींनी अनेक तक्रारी केल्या. घराच्या आजूबाजूचे, शाळाबाह्य मुले, विद्यालयातील काही मुले तसेच काही स्कूल व्हॅनचे चालक आदींबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे यादव यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Ahmednagar: ‘तिची छेड काढली जातेय का?’  मुलींच्या संरक्षणासाठी नगर पोलिसांचा पुढाकार, मुलांना केले 'हे' आवाहन
Lalit Patil Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट! ससूनमधील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com