अहमदनगर : जंगल सुरक्षित राखा अन्‌ पुरस्कार मिळवा

अकोल्यात वन्य जीव विभागाचा पुढाकार; गावांना मिळणार विकासनिधी
 forest
forest sakal

अकोले : तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात डोंगरांना लागणाऱ्या वनव्यांचे प्रमाण घटले आहे. जंगलांचे रक्षण करणाऱ्या व आगीच्या घटनांना आळा घालणाऱ्या गावांना वन्य जीव विभागाच्या वतीने विशेष पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती भंडारदरा वन्य जीव विभागाने दिली आहे.

अभयारण्य क्षेत्रात आग लागू नये, यासाठी कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वन्य जीव विभागप्रमुख सहायक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे, भंडारदरा वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अधिकारी अमोल आडे व हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांनी जंगलांना आग लागणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

जंगलातील गवत जर उन्हाळ्यात पेटवून दिले, तर पावसाळ्यात गवताचे प्रमाण वाढते, हा गैरसमज जनतेत आहे. हा गैरसमज दूर करण्याचे काम वन विभागाकडून करण्यात आला आहे. आदिवासींकडून भाताचे रान भाजण्यासाठी वृक्ष तोडून त्याचा पाला पाचोळा राबणीसाठी वापरला जातो. त्यामुळे प्राणी-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होतो. जंगलात अनेक औषधी वनस्पती असून, त्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यास त्या समूळ नष्ट होतात. त्यासाठी जंगलांना वनवा लागणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन वन्य जीव विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तर जंगलाचे रक्षण व्हावे, यासाठी जंगलांना आग लागल्यास आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक गावात वन समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठिकठिकाणी वन विभागाकडून जाळपट्टे घेण्यात आले आहेत, तर ज्या गावांच्या हद्दीत वणवा लागणार नाही, त्या गावांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तर कारवाई होणार

विनाकारण जंगलांना आग लावत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नाशिक विभागाचे सहायक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे व दत्तात्रय पडवळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com