
अहमदनगर : महामार्गावरील साडेपाचशे ‘ब्लॅक स्पॉट’ने (धोकादायक वळणे) पाच वर्षात तब्बल तीन हजार २२४ प्रवाशांचा जीव घेतला आहे. उपप्रादेशिक परिवाहन व बांधकाम विभागाने वेळोवेळी अहवाल पाठवून देखील शासन या ‘ब्लॅक स्पॉट’कडे दुर्लक्ष करत आहे.
अपघातांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात नगर जिल्हा आघाडीवर आहे. सर्वाधिक अपघात नगर- पुणे, नगर- सोलापूर आणि नगर- मनमाड या महामार्गावर होतात. अपघातांचे हे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील महामार्गांवर सुमारे साडेपाचशे ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत. या स्पॉटवर अपघात होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग, बांधकाम विभाग यांच्या वेळोवेळी संयुक्त बैठका झाल्या.
‘ब्लॅक स्पॉट’बाबत काय उपाययोजना करता येतील, याचा उहापोह बैठकांमध्ये झाला. उपाययोजनांबाबतचा अहवाल देखील शासनाला पाठवण्यात आला. परंतु अनेक वर्ष उलटूनही हा अहवाल शासन दरबारी धूळखात पडला आहे. एकीकडे रस्ते अपघात रोखण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येते, तर दुसरीकडे हे अपघात होऊच नयेत, यासाठी सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होत नाहीत. स्थानिक पातळीवर देखील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांचा हकनाक जीव जात आहे.
।।क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान।।
संत तुकाराम महाराज हे प्रत्येक क्षणाला माणसाने सावधान राहण्याचा सल्ला देतात. आपण डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे वागू नये, त्याचा सदुपयोग करून आयुष्याचे कल्याण करावे नाहीतर काळ आयुष्य खाऊन टाकेल. हा अभंग इथे लागू पडतो, असा अन्वयार्थ सिद्धिनाथ मेटे महाराज लावतात.
काय हव्यात उपाययोजना?
शहरासह जिल्ह्यात साडेपाचशे ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. या स्पॉटवर अपघाती वळण म्हणून माहिती देणारे फलक हवेत. रस्त्यांचे रूंदीकरणे करणे, पूल बांधणे, धोकादायक वळणावर वाहतूक पोलिस नियुक्त करणे, वाहनांची वेगमर्यादा तपासण्यासाठी महामार्ग पोलिसांचे मनुष्यबळ वाढविणे यासारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणेने या उपाययोजना केल्या तर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वर्षभर वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले जाते. ओव्हर स्पीड आणि राँगसाईड ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. आपल्यासह समोरच्याचा जीव ेखील अनमोल आहे, ही बाब प्रत्येक वाहनचालकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात नक्कीच टळतील.
- कैलास वाघ, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.