अहमदनगर : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विखे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-डॉ. सुजय विखे पाटील,खासदार

अहमदनगर : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विखे पाटील

राहाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या वयोश्री योजनेने देशभरातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांचे जीवन आनंदी केले. मोदी यांनी कोविड लसीकरणाची जगात सर्वांत मोठी मोहीम यशस्वी केली. याउलट वीज तोडून राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळले. भाजपने धारेवर धरल्यावर आणि विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित केल्यावर सरकार एक पाऊल मागे गेले. आज जे निळवंडेच्या गप्पा मारतात, ते तीस वर्षांपूर्वी नेमके कुठे होते? असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

शिर्डी मतदारसंघातील केलवडसह खडकेवाके, पिंपरी लोकाई, नांदुर्खी, दहेगाव, वाळकी, डोऱ्हाळे, कोऱ्हाळे, आडगाव येथील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांना विविध साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. एन. सिंग, डॉ. आर. के. श्रीवास्तव, सुभाष गमे, पी. डी. गमे, काळू रजपूत, गणीभाई शेख, सचिन मुरादे, सतीश बावके, बाळसाहेब डांगे, उत्तमराव डांगे, संतोष ब्राह्मणे, सुनील गमे, नामदेव घोरपडे, नकुल वाघे, पूनम बर्डे, संगीता कांदळकर, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले की, केलवडसाठी १२ कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. तिचे काम लवकरच सुरू होईल. मोदी सरकारच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम सुरू आहे. राज्यातील महाआघाडी सरकारने सर्वांना वाऱ्यावर सोडले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ४१ हजार लाभार्थ्यांपर्यत आपण राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ पोहोचविला. परंतु शिर्डीचे खासदार मात्र कुठेही दिसत नाहीत. आमचे नाव घेतल्याशिवाय काहींना चैन पडत नाही. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि सर्वांना पुरुन उरतो. टीकाकारांनी आमची चिंता करू नये.

-डॉ. सुजय विखे पाटील,खासदार

Web Title: Ahmednagar Salt Farmer State Government Vikhe Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..