esakal | अहमदनगर : नामोल्लेखाचा वाद चिघळण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर : नामोल्लेखाचा वाद चिघळण्याची भीती

अहमदनगर : नामोल्लेखाचा वाद चिघळण्याची भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : शहरातील ग्रामीण रुग्णालयात बसविलेल्या ऑक्सिजन प्लँटचे उद्‍घाटन केल्यानंतर तेथील कोनशिलेवर उपस्थितीत नसणाऱ्या मंत्र्यांची नावे वरच्या बाजूला आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव खाली टाकल्याचा वाद वाढण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार, या पाचपुतेंच्या इशाऱ्याचा धसका घेऊन ती कोनशिला तेथून गायब झाली आहे. ती कुणाच्या आदेशावरुन काढली हे समजले नसले, तरी ग्रामिण रुग्णालयाने ती काढल्याचे मान्य केले. आता पालकमंत्री व सरकारचाच अपमान झाला नाही का, अशी चर्चा सुरू आहे.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती संयंत्राचे उद्‍घाटन केले. त्यासाठी आमदार पाचपुते यांनी स्थानिक विकास निधी दिला आहे. सदर कोनशिलेवर पाचपुते यांचे नाव खालच्या बाजूला टाकले गेल्याने संतप्त झालेल्या पाचपुते यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पोखरणा यांनी काष्टी येथे येत पाचपुते यांची मनधरणी केली होती. तथापि पाचपुते ती कोनशिला बदला, या मतावर ठाम राहिल्याचे समजले. त्यातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोनशिलेबाबत इशारा दिल्याचे समजले.

दरम्यान, आज दुपारनंतर ती कोनशिला तेथून गायब झाली आहे. या परिसरात कोरोना केंद्र व प्राणवायू निर्मिती संयंत्र असे दोन प्रकल्प आहेत. दोन्ही ठिकाणी लावलेल्या कोनशिला गायब झाल्या आहेत. त्यामुळे आमदार पाचपुते यांच्या इशाऱ्याला घाबरुन त्या काढून टाकल्या असल्याचे समजले. मात्र आता पालकमंत्र्यांनी केलेल्या उद्‍घाटनाची कोनशिला काढून टाकल्याने त्यांचा व पर्यायाने सरकारचाच अपमान झाला नाही का, असा प्रश्न पुढे आल्याने हा मुद्दा चिघळण्याची भीती आहे.

एक फोडल्याने दुसरी काढली

दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संघर्ष राजुळे यांना विचारले असता, एक कोनशिला अज्ञान व्यक्तींनी फोडली होती. त्यामुळे आम्ही दुसरी काढून टाकल्याचे उत्तर दिले. ती काढण्यासाठी कुणाचा आदेश अथवा सूचना होती, यावर त्यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. दरम्यान कोनशिला फोडल्या बद्दल पोलिसांत तक्रार दिली का, या प्रश्नावरही त्यांनी नकारार्थी उत्तर दिल्याने सगळाच गोंधळ असल्याचे समोर येत

loading image
go to top