Ahmednagar :'एक रुपयात विम्याची घोषणा, मात्र अग्रीम रक्कम अजूनही नाही'; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शंकरराव गडाख संतप्त

अवकाळीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, आमदार शंकरराव गडाख यांची मागणी
Ahmednagar :'एक रुपयात विम्याची घोषणा, मात्र अग्रीम रक्कम अजूनही नाही'; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शंकरराव गडाख संतप्त

Shankarrao Gadakh at Sonai: अवकाळी पावसाने नेवासे तालुक्यातील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक गावांमध्ये रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. आर्थिक मदत देण्याची घोषणा शासनाने केली असल्याने संबंधित विभाग व अधिकाऱ्यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत व आर्थिक मदतीचे प्रस्ताव त्वरित शासनाला पाठवावेत, अशी सूचना आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात चार वेळा झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कपाशी, तुरी व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. काही भागात तर बहुतांश पिके पाण्याखाली गेली आहेत.

रब्बी हंगामातील गहू, मका, कांदा, हरभरा पिकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. पावसाअभावी यंदा खरिपाचा हंगाम, तर वाया गेलाच, पण अचानक आलेल्या व आठवडाभर चाललेल्या या वादळी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही धोक्यात आल्याची बाब गडाख यांनी निदर्शनास आणून दिली.(Latest Marathi News)

Ahmednagar :'एक रुपयात विम्याची घोषणा, मात्र अग्रीम रक्कम अजूनही नाही'; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शंकरराव गडाख संतप्त
Suhana Sakal Swasthyam 2023 : स्वास्थ्यजागराची नांदी; महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

मागील वर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मदतीच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यानंतर चालू वर्षी मार्च, एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याची मदत मिळालेली नाही. विमा कंपनीची रक्कम मिळाली नाही.

शासनाने एक रुपयात विमा देण्याच्या घोषणा केल्या. मात्र, २५ टक्के अग्रीमच्या रकमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत. म्हणून शासनाने नोव्हेंबरमध्ये झालेल्या नुकसानीबद्दल आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर करावी व मागील मदतीच्या रकमा शेतकऱ्यांना त्वरित अदा कराव्यात, अशी मागणी आमदार गडाख यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar :'एक रुपयात विम्याची घोषणा, मात्र अग्रीम रक्कम अजूनही नाही'; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शंकरराव गडाख संतप्त
मोठी बातमी! दोन वर्षांत तब्बल एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या; मुख्यमंत्र्यांनी दिले CID चौकशीचे आदेश, सहभागी डॉक्टरची आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com