अहमदनगर : कापड बाजारात कोविड तपासणी

महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उपक्रम : तीन बाधित
covid 19 checking
covid 19 checkingsakal
Summary

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कडक नियमावली

अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कडक नियमावली केली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाग व दक्षता पथकाच्यावतीने कापड बाजारातील दुकानदारांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये तीनजण बाधित आढळून आलेले आहेत, अशी माहिती दक्षता सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांनी दिली.(Ahmednagar textile market Covid check)

covid 19 checking
Punjab Assembly Election: पंजाबी सूरसम्राट जनतेच्या दारात

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागासह दक्षता पथकाकडून सध्या तपासणी मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. शहरातील कापड बाजारातील व्यापाऱ्यांसह दुकानातील कर्मचाऱ्यांची महापालिका प्रशासनाकडून कोरोना तपासणी करण्यात आली. तसेच रस्त्यावरील काही नागरिकांचीही कोरोना तपासणी करण्यात आल्याचे नजान यांनी सांगितले.

कापड बाजारात एकूण ३०० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये तीन जण बाधित आढळून आलेले आहेत. त्यामध्ये दुकानातील दोन तर एक बाहेरील व्यक्तीचा समावेश आहे.

covid 19 checking
वाळूमाफियांची अशीही बनवाबनवी..!|डंपर पकडले एक दंड वेगळ्याच नंबरप्लेटवर

दुकानांची तपासणी

तपासणी पथकात यांचा होता समावेश कोरोना नियंत्रण कक्ष पर्यवेक्षक योगेश औटी, अमोल लांडे, भास्कर अकुबत्तीनं, अमोल लहारे, विष्णू देशमुख, गणेश वाघ, अक्षय चाहेर, बिलाल सय्यद, अरबाज शेख, धनयंज गिते, उज्ज्वला आगरकर, ओम शर्मा, नाझीम शेख, आनंद गोंधळे, अनिस शेख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com